गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार
घोसाळगड उर्फ वीरगड घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे. मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेत्रे आहे. शिवकालापासून प्रसिद्ध असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. रोहे येथून मुरुड या सागरकिनाऱ्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. इतिहास शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पुर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर् याच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोग